farmers_strike3-2

farmers_strike3-2

महाराष्ट्रात कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून रस्त्यावर उतरलाय. मध्यप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत.. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
निदर्शनं सुरू असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात पाच जण जखमी झाले. या पाचही जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी इतर तीनही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तातडीने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारचा सलग पाच वेळा कृषी कार्यासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या मध्य प्रदेशातील शेतकरीच आता रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी कर्जमाफीसोबत शेतकऱ्यांनी हमीभावाचीही मागणी केली आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *