Mantralay1-580x395

Mantralay1-580x395

शिवसेना मंत्र्यांच्या अनुपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी मारली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत बैठकीला गैरहजर राहिले.
सेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला नसून त्यांनी गैरहजर राहण्याची अनुमती मागितल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. तर शिवसेना-भाजपमध्ये कुठलाही वाद नसल्याचं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप आणि सेनेमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
आजच्या बैठकीत कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *