Maharashtra-farmers-strike

सातव्या दिवशीही शेतकरी संपाचं आंदोलन सुरूच,6 दिवसांत 278 कोटींचं नुकसान

महाराष्ट्र

Maharashtra-farmers-strike

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.नाशिकसह पुण्यामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं भाज्यांचे दर उतरले आहेत. नाशिकमध्येही भाजीपाला मोठ्या प्रमाणावर पोचला आहे. तर पुण्यामध्येही भाजीपाल्याची आवक 70 टक्के झाली आहे.
शेतकऱ्यांच्या संपामुळे गेल्या 6 दिवसात सरासरी 278कोटींचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारतर्फे नुकसानीचा नेमका आढावा अद्याप घेतला गेलेला नाही, मात्र मार्केट यार्ड आणि खूल्या बाजारात मिळून सरासरी एवढं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात 100 कोटीपेक्षा जास्त म्हणजे सर्वाधिक नुकसान झालं आहे.राज्यातील शेतकरी 1 जून रोजी संपावर गेला. पण या संपाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांनाच बसला आहे. भाजीपाला-फळं यासराख्या शेतमाल बाजार समित्यांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे हा शेतमाल एकतर शेतात, शेतकऱ्यांच्या घरात किंवा गोडाऊनमध्ये पडून आहे. यामध्ये शतकऱ्यांचं सुमारे 278 कोटींचं नुकसान झालं आहे. गेल्या 6 दिवसात नाशिकमध्ये दररोज सुमारे 20 कोटींची उलाढाल होते, म्हणजे- सरासरी सर्वाधिक 100 ते 120 कोटीचं नुकसान झालं आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात मिळून 80 ते 90 कोटी आणि इतर सर्व बाजार समित्यांचं मिळून सरासरी 80 कोटीचं नुकसान झालं आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *