Devendra-Fadnavis_Twitter@CMOMaharashtra

Devendra-Fadnavis_Twitter@CMOMaharashtra

राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची आज (बुधवारी) बैठक होणार आहे. त्यात कर्जमाफीवर काही महत्वाचा निर्णय होतोय का याकडेच सगळ्याचं लक्ष लागलं आहे.तर दुसरीकडे सातव्या दिवशीही शेतकरी आंदोलन सुरूच आहे.
तसंच आजच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण शेतकरी संपात शिवसेनेनं राजकीय उडी घेतल्याने मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत.दरम्यान, राज्यातल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या मंत्र्यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात राज्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन आणि संवाद यात्रे वेळी झालेला जनतेशी संवाद याबाबतचा आढावा घेतला गेला. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये प्रत्येक जिल्ह्यात असलेली परिस्थिती याबाबत विचारणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *