stormy_sea_and_sky_thundery_clouds_and_gray_ocean_cg1p53082388c_th

महाराष्ट्रात मान्सून उशिरा येणार !

महाराष्ट्र

stormy_sea_and_sky_thundery_clouds_and_gray_ocean_cg1p53082388c_th

सात जूनला महाराष्ट्र आणि मुंबईत येणारा मान्सूनला आता उशीर होण्याची शक्यता आहे.अंदमान आणि तिथून केरळात आलेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून तिथंच रमलाय.अरबी समुद्रातून गती मिळत नसल्याने मान्सून केरळच्या पुढे सरकलेला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ जूनला मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र मान्सूनचं आगमन लांबलंय. राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पण तो पाऊस मान्सूनपूर्व असल्याचं हवामान खात्यानं म्हणणं आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे. पण महाराष्ट्रात मान्सून येण्यासाठी ८ जून नंतरच स्थिती अनुकूल असेल असं सांगण्यात येत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *