Maharashtra-farmers-strike

शेतकरी संपाचा आज सहावा दिवस, भाज्यांचे दर कडाडले

महाराष्ट्र

Maharashtra-farmers-strike

शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. १ जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य काही मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपावर पाच दिवसांनंतरही तोडगा निघू शकलेला नाही. बाजारात भाजीपाला आणि फळांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर कडाडले आहेत. याची झळ साहजिकच सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण भाजपसोबत गेले अडीच वर्ष सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. शिवसेनेप्रमाणे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचा बंद करण्यात पुढाकार होता. संपाच्या निमित्ताने सर्वत्र भाजप विरोधात शिवसेना हे चित्र सर्रासपणे जागोजागी दिसलं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *