prannoy-roy1

एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

देश

prannoy-roy1

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने रविवारी उशिरा प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा मारला.यावेळी सीबीआयकडून प्रणव रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय आणि एका खासगी कंपनीविरोधात गुन्हाही दाखल केला. आयसीसीआय बँकेचे ४८ कोटी थकविल्याप्रकरणी प्रणव रॉय यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या नोंदीनुसार प्रणव रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी बँकेचे ४८ कोटी रूपये थकवल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दिल्ली, देहरादूनसह चार ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *