_ae424d86-5945-11e6-8ec9-11a86e94b7e9

महाडच्या सावित्री नदीवरील पूल पुन्हा सेवेत !

महाराष्ट्र

_ae424d86-5945-11e6-8ec9-11a86e94b7e9

Savitri-River

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील नवीन पुलाचं आज उद्घाटन होत आहे. गेल्या वर्षी २ आॅगस्ट रोजी सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला होता.या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा कार बुडाल्या होत्या. या गाड्यांमधील सर्व ४० प्रवाशांचा त्यामुळे मृत्यू झाला. त्यानुसार हा तीन पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला असून आजपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.या भीषण दुर्घटनेनंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ६ महिन्यांत नवीन पूल बांधण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज हा पूल बांधून तयार झालाय.
याच पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित रहाणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *