gslvmk3-new_1

जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण

देश

gslvmk3-new_1

देशातील सर्वात मोठे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे उपग्रह ‘जीएसएलव्ही मार्क ३’ च प्रक्षेपण करणार आहे. या उपग्रहात देशातच विकसित करण्यात आलेले क्रायोजेनिक इंजिन लावण्यात आले आहे. यामुळे अंतराळात उपग्रह यंत्रणा स्थापित होईल. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भविष्यात भारतातूनच अंतराळवीर अवकाशात पाठवता येतील. भारताला २.३ टनापेक्षा अधिक वजनाचे संपर्कयंत्रणा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी परदेशी जावं लागत होतं. जीसएसएलव्ही मार्क-३ मुळे आता आपल्याचा चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवणं शक्य होणार आहे. सध्या या प्रक्षेपकानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलयं.. कारण या द्वारे सोडण्यात येणा-या जीसॅट-१९ उपग्रहाद्वारे माहिती संपर्क तंत्रज्ञानात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे डिजिटल इंडियाला पाठबळ मिळेल आणि अधिक वेगवान इंटरनेट सेवा मिळू शकेल. जीसॅट-१९ या उपग्रहाचं वजन ३ हजार १३६ किलो इतकं आहे.
कारण भारताचे आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे हे उपग्रह आहे. यामुळे या क्षेत्रात आपल्याला स्वयंपूर्णता तर मिळेलच, शिवाय आपल्याला परदेशी ग्राहकही आकर्षित करता येऊ शकेल अशी माहिती, इस्त्रोचे अध्यक्ष एस.एस. किरणकुमार यांनी दिली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *