Horse-hit-car

राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात

देश

Horse-hit-car

जयपूरच्या सिव्हिल लाईनमध्ये रस्त्यावर नेहमीसारखी प्रचंड गर्दी होती. त्यात वाहनांमुळे अनेक ठिकाणी जाम लागलेला होता. याच रस्त्यांवरून घोडागाडीही जात असतात. एका कारवाल्यानं मोठ्यानं हॉर्न वाजवला आणि समोरून येणारा घोडा बिचकला. वाहनांच्या हॉर्नचा घोड्याला एवढा त्रास झाला की त्यानं डायरेक्ट कारवर उडी घेतली. त्यात गाडीच्या काचा फुटल्या आणि घोडा गाडीत घुसला.या अपघातामध्ये घोडा आणि कार चालवणारा जखमी झाला आहे. पंकज जोशी असं कार चालवणाऱ्याचं नाव आहे. उधळलेला घोडा थेट काच तोडून कारमध्येच घुसला. या घोड्याला अखेर पोलिसांनी बाहेर काढलं. या अपघातामध्ये पंकज जोशींच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *