z-security

सरकारवर दूध टँकरला ‘झेड’ सुरक्षा देण्याची वेळ !

महाराष्ट्र

z-security

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या दूध टँकरला झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहेत. पोलिसांच्या ताफ्यासह दुधाचे टँकर, पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.मुंबईत दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी झेड सुरक्षा देत टँकर रवाना करण्यात आले आहेत.सातारा , सोलापूर , सांगलीमधून निघालेल्या  दुधाचे २७ टँकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर पुणे मुंबई महामार्गावर हे टँकर काही काळ थांबविण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या टँकरला पोलिसांच्या ७ गाड्यांनी संरक्षण दिले आहे . मुंबईच्या दिशेने जात असताना कोणतेही टँकर अडवण्यात येऊ नये, यासाठी टँकरला झेड सिक्युरिटी देण्यात आली आहे . मुंबईमध्ये दुधाची आवक कमी झाल्याने पोलीस बंदोबस्तमध्ये दुधाचे टँकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.विशेषता व्हीव्हीआयपी,व्हीआयपी,राजकारणी,सेलिब्रिटी आणि क्रीडापटूंना झेड सुरक्षा देण्यात येते. मात्र, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे दुधाचे नुकसान होऊ नये, यासाठी दुधाच्या टँकरला सरकारला विशेष सुरक्षा देण्याची वेळ आली आहे.  कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार केला. १ जूनपासून सुरु केलेला संप अद्यापही शेतकऱ्यांनी कायम ठेवला आहे. या संपाची झळ महानगरांना बसू लागली आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागातील कृषी मालाचे व्यवहार आणि वाहतूक ठप्प झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *