indian-railways (1)

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचं कोकणवासियांना १४२ विशेष गाडया

महाराष्ट्र

indian-railways (1)

मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा तब्बल १४२ विशेष गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी, एलटीटी, दादर व पुणे ते करमाली, सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान या विशेष गाडया धावणार आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय होणार आहे.
०११८७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी एसी डबलडेकर गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटणार असून रत्नागिरीला दुपारी १ वाजता पोहचणार आहे.
०१४४५ सीएसटी-करमाली विशेष गाडी (२४फेऱ्या-वन वे) १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून करमाळीला दुपारी २ वाजून ३० मिनिटींने पोहचणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
– तर परतीच्या प्रवासासाठी ०११८८ रत्नागिरी- ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.
– दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, अरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापुर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *