money

नोटबंदीचा फटका,विकासदर मंदावला

देश

money

8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी झाल्यानंतर चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2017 या काळात अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याचंही दिसतं आहे. नोटबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्याचं सरकारी आकड्यांमधूनच स्पष्ट झालेलं आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा निदर्शक मानल्या जाणाऱ्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे आज सरकारनं जाहीर केले आहेत. त्यानुसार नोटबंदीच्या 2016-17 या आर्थिक वर्षात विकास दर 7.1 टक्के राहिला होता. याआधी 2015-16 या आर्थिक वर्षात विकास दर 8 टक्के इतका होता.त्यामुळे गत आर्थिक वर्षात तो जवळपास 0.9 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसतं आहे.नोटबंदीनंतर इतर सर्व क्षेत्रात विकास दर खालावला असला तरी केवळ कृषी क्षेत्रातच आशादायक स्थिती दिसली. मागच्या वर्षी 1.5 असलेला विकासदर यावेळी थेट 5.2 टक्क्यांवर पोहचलाय. सततच्या दुष्काळानंतर मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं कृषी विकासदरात त्याचा परिणाम दिसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. नोटबंदीनंतर जीडीपी किमान दोन टक्क्यांनी खालावेल अशी भीती देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *