nagar-farmer-strike_1

राज्यातील शेतकरी आजपासून संपावर

महाराष्ट्र

nagar-farmer-strike_1

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. राज्यातील शेतकरी आजपासून संपावर गेला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध, भाजीपाला, फळं यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिर्डी आणि नगरमध्ये दुधाचे टँकर रस्त्यावर ओतून देण्यात आले आहेत, तर भाजीपालाही रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. साताऱ्यात वारणा दूध डेअरीच्या 2 टँकर्सची आंदोलकांनी तोडफोड केली आहे. नाशिक, नगरमधल्या जवळपास सर्वच बाजार समित्याही ओस पडल्या आहेत. मनमाडमध्येही संपाचे तीव्र पडसाद उमटताना दिसताहेत, बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.शेतकरी संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता शेतकऱ्यांनी समितीकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. एरव्ही गजबजलेल्या समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *