1_rupee_bill_historical

एक रुपयाची नवी नोट चलनात येणार !

देश

1_rupee_bill_historical

केंद्र सरकार एक रुपयाची नवी नोट जारी करणार आहे. नव्या नोटा चलनात आल्या तरी जुन्या नोटाही चालू राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतीत घोषणा केली आहे.एक रुपयांच्या नवीन नोटांची छपाई झाली असून या नोटा लवकरच चलनात येतील, असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटलं आहे. नव्या नोटेवर ‘GOVERNMENT OF INDIA’ च्या वर देवनागरीमध्ये ‘भारत सरकार’ असं लिहिलेलं असेल.एक रुपयाची नोट सरकारकडून चलनात आणली जाते आणि त्यावर अर्थ मंत्रालयाच्या सचिवांची स्वाक्षरी असते. तर इतर नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *