farmers-are-not-happy-with-the-union-budget-of-2017

१ जूनपासून बळीराजा संपावर !

देश

farmers-are-not-happy-with-the-union-budget-of-2017

शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतून समाधान न झाल्याने शेतकरी १ जूनपासून संपावर जाणार आहेत.पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता.
हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *