modi-germany_story_647_053017055522

modi-germany_story_647_053017055522

भारत-जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी मोदी यांनी व्यापार, कौशल्य विकास, सायबर सुरक्षा व दहशतवाद अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात सायबर गुन्हेगारी, विकास कार्यक्रम, शाश्वत शहर विकास, कौशल्य विकास, रेल्वे सुरक्षा यांचा समावेश आहे. शाश्वत विकासासाठी भारत-जर्मन केंद्राची स्थापनाही केली जाणार आहे. मर्केल यांनी सांगितले की, भारत हा विश्वासू भागीदार आहे हे सिद्ध झाले आहे, दोन्ही देशांचे सहकार्य वाढत आहे.दहशतवादाबाबत मोदी यांनी सांगितले की, मानवतावादी शक्तींनी या आव्हानाविरोधात एकजूट केली पाहिजे. भारत व जर्मनी यांच्यात द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांची दिशा निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यात चौथ्या फेरीची आंतरसरकारी चर्चा झाली. मोदी यांचे लष्करी सलामीत स्वागत करण्यात आले. त्यांचे मर्केल व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *