balchitrawani2-580x395 (1)

पुण्यातील बालचित्रवाणी बंद – राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र

balchitrawani2-580x395 (1)

पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आणि ५० पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इतकंच नाही तर आजच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे.राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे.बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर चालत नाहीत. एखाद्या संस्थेवर इमोशनल होऊन आपण त्याचं नुकसान करण्यापेक्षा, काळानुरुप ती कशी बदलेल, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज कशी भागवता येईल ह्यावर माझा जोर आहे, असं सांगत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणी कायमची बंद होणार असल्याचे संकेत दिले होते.
बालचित्रवाणीऐवजी आता ई- बालभारती ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *