229886-152220-babri

अयोध्येतील बाबरी मशीदप्रकरणी सर्व १२ आरोपींना जामीन मंजूर

देश

229886-152220-babri

अयोध्येतील बाबरी मशीदप्रकरणी आज लखनऊच्या न्यायालयानं सर्व १२ आरोपींना जामीन मंजूर केला आहे. गेल्या महिन्यात १९ एप्रिल रोजी सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले होते.भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय मंत्री उमा भारती अशा दिग्गज नेत्यांचा या आरोपींमध्ये समावेश असल्यानं या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
लखनऊमधील विशेष कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानुसार आज अडवाणी आणि जोशी यांच्यासह १२ बडे नेते लखनौ न्यायालयात हजर झाले होते.याप्रकरणी एकूण १७ आरोपी आहेत. त्यापैंकी पाच आरोपींची सुनावणी गेल्या ११ तारखेपासून सुरू झालेल्या सुनावणीत घेण्यात आली. आज एकूण १२ जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय.५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. लखनौच्या सीबीआय न्यायालयानं हा जामीन मंजूर केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *