monsoon-7591

विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी !

महाराष्ट्र

monsoon-7591

 

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे काही काळ अमरावती शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर नागपूरमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणारे नागपूरकर थोडा का होईना गारवा सध्या अनुभव आहेत.मुंबई आणि जवळच्या परिसरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मुंबईतही लवकरच पावसाच्या सरी बरसतील अशी मुंबईकरांना आशा आहे.दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं काल संध्याकाळी दमदार हजेरी लावली. जवळपास १ तास संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडला. गेल्या काही दिवसापासून भंडाऱ्यातील पारा चांगलाच वाढला होता. मात्र, या पावसामुळे आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर अकोल्यातील मुर्तिजापूर तालुक्यात पावसामुळे राजनापूर, खिनखिनी या गावात घरांची पडझड झालीय.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *