uzma

पाकिस्तान म्हणजे ‘मौत का कुआँ – उजमा

देश

uzma

पाकिस्तानमध्ये अडकलेली भारतीय महिला उजमा आज भारतात परतली. सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत तिचं स्वागत केलं. पाकिस्तनात महिलाच काय पण पुरुषही सुरक्षित नाहीयेत. पाकिस्तानमध्ये जाणं सोपं आहे पण तिथून परत येणं अवघड आहे. पाकिस्तान हा मृत्यूचा सापळा आहे. जे मुस्लिम आहे त्यांना पाक चांगला देश वाटतोय पण असं काही नाही,अशी उजमाने भारतात परतल्यावर प्रतिक्रिया दिली.
दिल्लीची राहणारी उजमा याच महिन्यात पाकिस्तानात फिरायला गेली होती. पाकिस्तानमधील ताहीर या व्यक्तीशी तिची मलेशियात ओळख झाली होती. त्यामुळे त्याला भेटणं या हेतूनं ती पाकिस्तानात गेली होती. पण पाकिस्तानात गेल्यानंतर ताहीरनं तिचं अपहरण करुन जबरदस्तीनं निकाहनाम्यावर सह्या घेतल्या.मी फक्त पाकिस्तानमध्ये फिरायला गेली होती, मला वाटलं की, मी १ तारखेला गेल्यानंतर १० किंवा १२ तारखेला परत येईन. पण असंच काहीच झालं नाही. मला माहितच पडलं नाही की, ताहीरनं मला कधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका विचित्र अशा गावामध्ये होते. तेथील लोकांचं वागणंही विचित्रच होतं. तिथं ताहीरनं माझ्यावर शारीरिक, मानसिक अत्याचारही केले. त्यानंतर त्यानं मला धमकीही दिली की, जर तू माझं म्हणणं ऐकलं नाही तर दिल्लीत असणाऱ्या तुझ्या मुलीचंही आम्ही अपहरण करु. माझ्या मुलीची भीती दाखवल्यानं मी निकाहनाम्यावर सही केली.’ असं उजमा म्हणाली.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *