IMG-20170525-WA0140-580x395

अग्निशमन दलाने वाचवले घारीचे प्राण

मुंबई

IMG-20170525-WA0140-580x395

मुंबईतल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका घारीचे प्राण वाचविले आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका झाडावर उलट्या लटकलेल्या या घारीचे सुटकेचे प्रयत्न सुरु होते. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवलं.अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्यानं एका दोरीत पंख अडकलेल्या घारीला अलगद मुक्त केलं आणि घारीसह सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. बिथरलेल्या आणि जखमी झालेल्या या घारीला बास्केटमध्ये घालून पुढील उपचारांसाठी नेण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *