dholasadiyabridge-kNzD--621x414@LiveMint

देशातील सर्वाधिक लांबीच्या पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

देश

dholasadiyabridge-kNzD--621x414@LiveMint

सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतरच कमी होणार नाही तर या पुलाचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे.ब्रम्हपुत्रा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचा सर्वाधिक फायदा भारतीय लष्कराला होणार आहे. या पुलामुळे लष्कराला भारत-चीन सीमेवर पोहोचण्यासाठी तीन ते चार तास लागणार आहेत. या सीमेवर भारताच्या किबिथू, वालॉन्ग आणि चागलगाम या चौक्या आहेत. ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाच्या उभारणीसाठी १० हजार कोटींचा खर्च आला आहे. पुलाच्या निर्मितीला विलंब झाल्याने या पुलाच्या उभारणीच्या खर्चात वाढ झाली. पुलाला जोडण्यासाठी २८.५ किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. बोगीबील नावाचा पूल सुरु झाल्यावर अरुणाचल प्रदेश ते इटानगर दरम्यानचा प्रवास ४ ते ५ तासांवर येणार आहे.
मुंबईतील बांद्रा-वरळी सी लिंक ५.६ किलोमीटर लांबीचा आहे. मात्र ब्रम्हपुत्रा नदीवरील पुलाची लांबी बांद्रा-वरळी सी लिंकपेक्षा जास्त आहे. ९ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा असलेला ब्रम्हपुत्रा नदीवरील पूल देशातील सर्वाधिक लांबीचा पूल असणार आहे. या पुलामुळे अरुणाचल प्रदेशमधील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *