helipcopter

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील चारहीजण सुखरूप

महाराष्ट्र

helipcopter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडं येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील अन्य चारहीजण सुखरूप आहेत.निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर ५० फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
भाजपच्या शिवार संवाद यात्रेला आज लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून सुरुवात झाली. त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते. तिथे श्रमदान केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडं येण्यासाठी निघाले होते. मुंबईकडं येण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरनं टेकऑफ घेतला खरा, पण काही क्षणातच ते जमिनीवर कोसळलं. सुदैवाने, दुर्घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्यानं अनर्थ टळला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं कळतं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *