Penguins-Inside-Zoo

हॅम्बोल्ट पेंग्विनसाठी उभारण्यात आलेल्या कक्षातील विजेच्या बिलाचा खर्च दरमहा १० लाख रुपये

मुंबई

Penguins-Inside-Zoo

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानातील (राणीची बाग) हॅम्बोल्ट पेंग्विनसाठी उभारण्यात आलेल्या कक्षातील केवळ विजेच्या बिलापोटी प्रशासनाला दरमहा १० लाख रुपये मोजावे लागत आहेत. आधीच या पेंग्विनसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले असताना आता या पेंग्विनच्या देखभालीवरही लाखो रुपये खर्च होत असल्याबद्दल महापालिका प्रशासन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या आग्रहाखातर प्रशासनाने तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून आठ हम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणले. पेंग्विनसाठी आधुनिक सुविधा आणि पेंग्विनसाठी आवश्यक ते तापमान राखण्याची सुविधा उपलब्ध असलेला कक्ष उभारण्यात आला. त्यावरही कोटय़वधी रुपये खर्च झाले. पेंग्विनसाठी उभारलेल्या कक्षासाठी दर महिन्याला वीज बिलापोटी पालिकेला १० लाख रुपये खर्च येत आहे. म्हणजे वर्षांकाठी १.२० कोटी रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. त्याशिवाय राणीच्या बागेत अन्यत्र वापरण्यात येणाऱ्या विजेवरही मोठा खर्च पालिकेला करावा लागणार आहे.हा सर्व खर्च करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांमधूनच करण्यात आला. त्यातच आता राणीच्या बागेचे प्रवेशशुल्क वाढवण्याचाही प्रस्ताव पुढे येत

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *