GST

जीएसटीमध्ये काय झाले स्वस्त – दूध,अन्नधान्यावर कर नाही

देश

GST

देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीअंतर्गत बहुतांश वस्तूंवरील करांच्या दरावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती झाली आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झाले आहेत. एकूण १२११ वस्तूंमधून सात वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय. यात धान्य आणि दुधाचा समावेश आहे.चैनी वस्तूंवर जास्त कर आकारण्यात येणार असल्याचं दिसतंय. छोट्या कारवर २८ टक्के जीएसटी लावण्यात येणार असून त्यासोबत सेसही आकारण्यात येईल. तर लक्झरी कारवरती जीएसटीसह १५ टक्के सेस लावण्यात येईल. 5, 12, 18, आणि 28 टक्क्यांच्या कराचा दर निश्चित केला आहे . मिठाई, खाद्य तेल, साखर, चहा पावडर, कॉफी, कोळसा, मसाले आणि औषधं इत्यादींना 5 टक्के कराच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं आहे.एसी आणि फ्रीजवरही 28 टक्केकरआकारला जाईल. सध्या या वस्तूंवर 30-31 टक्के कर आकारला जातो.

केसांचं तेल, टूथपेस्ट आणि साबणवर 18 टक्के कर लावण्यात येईल. सध्या यावर 28 टक्के कर आकारला जातो. तर मनोरंजनावरही 18 टक्के कर आकारण्यात येईल.त्यामुळं महागाई कमी होण्याची चिन्ह आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *