DSCN2233

जगभरात सायबर हल्ल्याची भिती , सुरक्षा यंत्रणांनी दिला सावधानतेचा इशारा

देश

DSCN2233

सायबर हल्ल्यासाठी रॅनसमवेअर नावाच्या व्हायरसचा वापर केला आहे. रॅनसमवेअर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो.सायबर हल्ल्यांची ही मालिका शुक्रवारी सुरु झाली. बँका, रुग्णालये, खाजगी आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्टची जुनी ऑपरेटिंग सिस्टमच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. आणखी सायबर हल्ले होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दहा वर्षांतील हा सर्वांत मोठा सायबर हल्ला असल्याचे मानण्यात येत आहे. ‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील जवळपास 2 लाख संगणकांना फटका बसला आहे. अजूनही हा धोका पूर्णपणे टळलेला नसून, सोमवारी आणखी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.युरोप, अमेरिकेला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला असला तरी, आशिया खंडात या सायबर हल्ल्याचा अजूनपर्यंत अंत्यत वाईट परिणाम दिसून आलेला नाही.
रॅनसमवेअरकडून ‘विंडोज एक्सपी’ या ऑपरेटिंग सिस्टीमला लक्ष्य करण्यात येत आहे. भारतातील 70 टक्के एटीएममध्ये हीच यंत्रणा वावरण्यात येत आहे. त्यामुळे, नव्या सायबर हल्ल्यांमुळे भारतीय एटीएमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *