Shivneri

एसटी मध्येही परिवर्तन, स्टील बस लवकरच रस्त्यावर धावणार!

महाराष्ट्र

Shivneri

स्टील बांधणीची परिवर्तन बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. एसटी महामंडळानं आपली परिवर्तन बस एका वेगळ्या स्वरुपात आणण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्टील बांधणीच्या परिवर्तन बसची घोषणा केली होती.प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत आता ही बस स्टीलमध्ये बांधण्यात येईल. याआधी एसटी बस अल्यूमिनियम बांधणीची होती. अल्यूमिनियमच्या बस वजनाने हलक्या होत्या, तसंच अपघातामध्ये होणाऱ्या बसच्या नुकसानीची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मजबूत आणि दणकट अशा माइल्ड स्टीलमध्ये नव्या एसटी बसची बांधणी करण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आल्याचं एसटी महामंडळानं म्हटलं आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *