BESTBus

लग्नाचं वऱ्हाड समारंभस्थळी नेण्यासाठी ‘बेस्ट’ पर्याय

मुंबई

BESTBus

मुंबईकरांना लग्नाला वऱ्हाड न्यायला गाडीच मिळत नसेल, तर यजमानांना ‘बेस्ट’च्या गाड्या उपलब्ध होणार आहेत. कमी दरात या बस भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.लग्नाचं वऱ्हाड समारंभस्थळी नेण्यासाठी आता एक ‘बेस्ट’ पर्याय खुला झाला आहे.यजमानांच्या मागणीनुसार सिंगल आणि डबलडेकर बसही मिळू शकणार. तसेच चित्रीकरणासाठीही ‘बेस्ट’ बस मिळणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी या उपक्रमाचा फायदा घेण्याचं आवाहन केलं आहे.
‘बेस्ट’ची बस हवी असेल तर ‘बेस्ट’चा टोल फ्री क्र. 1800 227550 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या गाड्यांच्या बुकिंगसाठी www.bestundertaking.com या वेबसाइटवरही माहिती आणि दरपत्रक देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *