pic

नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान कोस्टल रोडला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई

pic

कोस्टल रोड प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.हा कोस्टल रोड नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारण्यात येणार आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे . त्यामुळे नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान ३५ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. हा महत्त्वाकांक्षी मार्ग उभारण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली होती.
कोस्टल रोडला परवानगी मिळाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी सुटण्यास हातभार लागणार असून इंधनबचतीच्या दृष्टीनेही कोस्टल रोड महत्त्वाचा ठरणार आहे.
केंद्र सरकारने कोस्टल रोडला मंजुरी देऊन शिवसेनेला रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चाही रंगली आहे. शिवसेनेने जीएसटीला पाठिंबा दर्शवल्याने सरकारने रिटर्न गिफ्ट म्हणून कोस्टल रोडला परवानगी दिल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *