beautiful-rain-pictures-45-photos-04

मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण १५ मे पर्यंत अंदमानात दाखल होणार ?

देश

beautiful-rain-pictures-45-photos-04

लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार आहे. पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ १५ मे दरम्यान असतो. गेले चार पाच दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचायला पोषक आहे.त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल.उत्तर आणि पश्चिम भारतात वाढणारं तापमान. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान पडलेला अवकाळी पाऊस, पूर्व किना-यावर झालेली च्रकी वादळासारखी परिस्थिती हे सगळे वातावरणीय बदल मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असल्याच नव्या डायनामिक मॉडेल द्वारे स्पष्ट होतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *