AirAsia-9M-AFY-Airbus-A320-216-Aircraft_10044373

विमान प्रवास करणाऱ्यांना लाभ तिकीटदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलणार

देश

AirAsia-9M-AFY-Airbus-A320-216-Aircraft_10044373

सरकारी उडाण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवेनुसार विमानांचे तिकीट दर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलणार आहेत.त्यासाठी या कंपन्यांना अनुदान दिले जात होते. या अनुदानातही सरकारकडून बदल होणार असल्याने तिकीट दरात बदल होणार असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले.या योजनेचा मुख्य उद्देश ज्या ठिकाणी विमानप्रवास कमी होत असलेल्या विमानतळांना जोडणे तसेच लोकांना कमी दरात विमान प्रवास उपलब्ध करुन देणे हा आहे.या योजनेंतर्गत ठरविल्या जाणाऱ्या प्रवासी भाडयांची मर्यादा ठरलेली आहे. तसेच या योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या एअरलाईन कंपनीला व्यावहारिक रुप देण्यासाठी निधी देण्यात येतो. या निधीबाबत होणाऱ्या संशोधनानुसार प्रवासी भाड्यात बदल होणार आहे. नागरी विमान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे दर तिकिटांची किंमत, डॉलरमध्ये होणारा बदल आणि प्रत्यक्ष व्यावहारिक मूल्य यावर ठरविण्यात येणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *