banner9

बुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना वन्यप्रेमींची एकच गर्दी

महाराष्ट्र

banner9

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे दिसतो, याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं ही प्राणीगणना केली जाते. १० मे रोजी बुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना होत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमींनी एकच गर्दी केली आहे. ही प्राणीगणना ताडोबाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात केली जाणार असून, त्यासाठी लोखंडी आणि लाकडी मचाणं उभारण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत २४ तास या मचाणांवर बसून प्राण्यांची गणना करायची असते. यासाठी ती दरवर्षी बुद्धपौर्णिमेला केली जाते. याही वर्षी ती आज होत आहे. बुद्धपौर्णिमेला चंद्र नेहमीपेक्षा अधिक प्रकाशमान असतो. त्यामुळं दिवस-रात्र मचाणीवर बसून प्राण्यांची गणना करावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *