pile-of-garbage

पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य. पुणे महापालिकेला अपयश

महाराष्ट्र

pile-of-garbage

कचराकोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करु शकलेली नाही.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्यानं शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळं आरोग्याचाही धोका निर्माण झाला आहे.पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.
पुण्यातील कचराकोंडीला आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत. कचऱ्यावरुन काल पुण्यात आंदोलनं झाली.कचरा डेपोचं निधन झालं असं म्हणत फुरसुंगी आणि उरळीमधील गावकऱ्यांनी काल अंत्ययात्रा काढली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.परदेश वारीवरुन आलेले महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी कचराकोंडी फोडण्याचं आश्वासन दिलं. मात्र अजूनही महापालिकेला यश आलेलं नाही.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *