3631c6922e3cdce73ede13968f5c9fad_m

बिल्कीस बानो प्रकरणी 11 आरोपीना जन्मठेपेची शिक्षा कायम- मुंबई हायकोर्ट

देश

3631c6922e3cdce73ede13968f5c9fad_m

गुजरात मध्ये ३ मार्च २००२ साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडीत बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षेविरोधातली याचिका फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ११ दोषी आरोपींची जन्मठेप शिक्षा कायम ठेवली आहे.
गुजरातची राजधानी अहमदाबादपासून २५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रंधीकपूर गावातील बिल्कीस कुटुंबावर जमावाने हल्ला केला होता. त्यावेळी बिल्कीसचे वय १९ वर्षे होते आणि ती ५ महिन्यांची गर्भवती होती. यावेळी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बिल्कीसच्या कुटुंबातील १४ जणांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये तीन दिवसांच्या एका चिमुरड्याचा समावेश होता.सामूहिक बलात्कार केल्यानंतर बिल्कीसला मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे बिल्कीस मरण पावली असल्याचे समजून आरोपी तिथून निघून गेले. या प्रकरणात सीबीआयने तिघांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. बिल्कीससोबत अत्यंत क्रूर वर्तन केल्याने सीबीआयने तिघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. २००५ पासून बिल्कीस प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *