226824-540777-naxals

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद

देश

226824-540777-naxals

छत्तीसगडमधील सुकमा जिल्हय़ातील नक्षली हल्ल्यात 26 जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यात अक्षरश: धुडगूस घातला. दोन चकमकी, एक सुरूंग स्फोट यांत एक जवान शहीद झाला आहे.सुरेश तेलामी असं या जवानाचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी जवानांची 2 बुलेटप्रूफ गाड्या उडवल्यात. भुसुरुंग स्फोट घडवत नक्षल्यांनी हे कृत्य घडवलंय.यात 19 जवान जखमी झाल्याचं वृत्त समोर येतंय. जखमींना तात्काळ रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.  या कारवाईत पोलिसांनी नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *