kedarnath-3

केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं

देश

kedarnath-3

शिव शंकराचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या केदारनाथाचं हे शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वांत उंचीवरचं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेलं आहे.आज सहा महिन्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यात आले. यावेळी प्रथम दर्शन आणि रुद्रअभिषेकाचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला. दरवर्षी उन्हाळाच्या दिवसात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात. दरवर्षी हा दरवाजे उघडण्याचा कार्यक्रम एक मोठा सोहळा असतो. पण तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापूरानंतर भाविकांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आज तीन वर्षानंतर पुन्हा एकदा केदारनाथाचे दरवाजे उघडण्याचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला. त्या सोहळ्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. आजच केदारनाथाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथाचं दर्शन घेणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच व्यक्ती ठरलेत. केदारनाथ मंदिरात मोदींनी रुद्राभिषेकही केलाय. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी केदारनाथ मंदिरात दाखल झालेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *