cbi-main1

मुंबईत आयकर विभागातील आयुक्तांना लाच घेतल्या प्रकरणी अटक

मुंबई

cbi-main1

मुंबई आयकर विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आयकर खात्यातील अपील विभागाचे आयुक्त बी व्ही राजेंद्र यांना अटक केली आहे.सीबीआयने मंगळवारी रात्री बी.व्ही राजेंद्र प्रसाद यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकाला.काही कॉर्पोरेट कंपन्यांवर मेहेरनजर केल्याचा आरोप आहे. याबद्दल सीबीआयला माहिती मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. सीबीआयकडून काल रात्री गुप्तपणे ही कारवाई पार पाडण्यात आली. आतापर्यंतच्या छापेमारीत त्यांच्याकडून दीड कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *